केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 अंतर्गत केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट, रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी, नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी, पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II पदांच्या एकूण 838 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव (आवश्यक असल्यास) धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदांचा तपशील Post Details - एकूण जागा - 838
अ. क्र. | पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक अहर्ता |
---|---|---|---|
1 | केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट | 349 | एमबीबीएस (MBBS) वैद्यकीय पदवीधर |
2 | रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी | 300 | |
3 | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी | 5 | |
4 | पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II | 184 |
वयोमर्यादा Age Limit : दिनांक 1 ऑगस्ट 2021 रोजी 32 वर्षांपर्यंत (एससी/एसटी 5 वर्ष, ओबीसी 3 वर्ष शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क Exam Fees : ओपन/ओबीसी 200 रु. (एससी/एसटी/अपंग/महिला - निःशुल्क)
अर्ज करण्याची पद्धत How To Apply :
1) खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2) त्यानंतर Apply Online लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा.
3) अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रत (सॉफ्ट कॉपी) आपल्या जवळ ठेवावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2021 (06:00 PM)
परीक्षा: 21 नोव्हेंबर 2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.